PM Vishwakarma Yojana Maharashtra 2023 केंद्रशासनाकडून भारतातील विविध समाजासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. यामध्ये अल्पसंख्यांक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, इत्यादी विविध वर्गांचा समावेश आहे. चालू वर्षातील भारताच्या अर्थसंकल्पामध्ये अशाच एका समाजासाठी एक नवीन योजना घोषित करण्यात आलेली आहे. या योजनेचं नाव म्हणजे PM विश्वकर्मा कौशल सन्मान योजना किंवा विश्वकर्मा श्रम सन्मान योजना होय. भारताचा अर्थसंकल्प सादर करतांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यामार्फत विविध अशा महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये शासनाकडून विश्वकर्मा समाजासाठी कल्याणकारी योजना सुरू करण्याची एक महत्वपूर्ण घोषणा देखील करण्यात आलेली होती. शासनाकडून विश्वकर्मा समाजासाठीच्या या कल्याणकारी योजनेला पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना असं नाव देण्यात आलं आहे. विश्वकर्मा समाजाअंतर्गत मोडणाऱ्या जवळपास 140 जातींचा समावेश सदर योजनेत करण्यात आलेला असून या जातींना योजनेचा लाभ मिळणार आहे.15 ऑगस्ट 2023 रोजी 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्यामार्फत लाल किल्ल्यावर देशाला संबंधित करताना कारागिरांसाठीची विश्वकर्मा योजना जाहीर करण्यात आली. या योजनेचा उद्देश देशभरातील कारागीर आणि शिल्पकारांची कौशल्य क्षमता वाढवणे आहे. शासन सुरुवातीला या योजनेसाठी 13,000 कोटी रुपयापासून ते 15,000 कोटी रुपयापर्यंत गुंतवणूक करणार आहे. ज्यामध्ये कौशल प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिक सहाय्य इत्यादींचा समावेश असेल.
Pm Vishavkarama Yojana 2023 विश्वकर्मा योजना महाराष्ट्र
PM विश्वकर्मा श्रम सन्मान योजना देशातील इतर राज्यासह महाराष्ट्र राज्यासाठीसुद्धा लागू असेल; कारण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला विश्वकर्मा समाजातील कारागीर आढळून येतात, ज्यामध्ये सुतार, नाविक, लोहार, सोनार, कुंभार, शिंपी, धोबी इत्यादी विविध क्षेत्रातील कारागिरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील कामगारांसाठी ही योजना उपलब्ध असल्यामुळे आम्ही विश्वकर्मा योजना मराठी भाषेमध्ये माहिती उपलब्ध करून देत आहोत.
योजना नाव | PM विश्वकर्मा योजना |
योजना कोणी सुरु केली | केंद्रशासनद्वारा |
घोषणा कोणी केली | अर्थमंत्री निर्मला सीतारामन |
उद्देश | व्यवसाय मार्गदर्शन, आर्थिक मदत |
एकूण निधी | 13,000 ते 15,000 करोड रु |
लाभार्थी वर्ग | विश्वकर्मा समाजातील जाती |
Pm vishavkarama Yojana 2023 PM विश्वकर्मा योजना लाभ कोणाला मिळणार
1) लोहार
2) कुलुपांचे कारागीर
3) सोनार
4) कुंभार
5) लोहार
6)मूर्तिकार
7) मोची
8) सुतार
9) नाविक
10) टेलर
11)धोबी
12) मच्छीमार
हातोडा इत्यादी कीट बनविणारे कारागीरलहान मुलांची खेळणी बनविणारे कारागीरचटई, झाडू बनविणारे कारागीरवारीक म्हणजेच सलूनमध्ये काम करणारे कारागीर
PM vishavkarama Yojana 2023 Skill कौशल विकास अभ्यासक्रम
पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कामगारांना जास्तीत जास्त कौशल्य कशी विकसित करता येतील, यावरती भर दिला जाईल. त्याचप्रमाणे कामगारांना आधुनिक उपकरण व डिझाईनची माहिती देण्यात येईल आणि पारंपारिक कामगारांना आधुनिक यंत्र, उपकरण खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येईल.विश्वकरर्मा योजना च्या माध्यमातून कामगारांना सामान्यतः दोन प्रकारच कौशल्य विकास अभ्यासक्रम घेण्यात येईल. मूलभूत आणि प्रगत, कोर्स करणाऱ्या कामगारांना स्टायफंड म्हणून प्रतिदिन 500 रुपयेसुध्दा देण्यात येतील.
Pm vishavkarama Yojana 2023 start योजना कधी सुरु होणार ?
पीएम विश्वकर्मा योजना महाराष्ट्र 2023 ही पुढील महिन्यातील 17 तारखेला सुरू होईल, म्हणजेच 17 सप्टेंबर 2023 दिवशी देवांचे शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त अवचित साधून या योजनेचा शुभारंभ करण्यात येईल. कारागीर आणि लहान व्यवसायिकांना या योजनेचा मोठा फायदा होईल. पारंपारिक व्यवसाय करत असलेल्या कामगाराकडे कौशल्य असेल आणि त्यांच्याकडे भांडवल नसेल, तर अशा परिस्थितीत त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे
PM Vishvakarma Scheme Launched 2023 पी एम विश्वकर्मा योजना कधी सुरू झाली
17 सप्टेंबर 2023 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत PM विश्वकर्मा योजनेची सुरुवात करण्यात आली. आता इच्छुक व पात्र विश्वकर्मा समाजातील कामगारांना आपल्या व्यवसायासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून कर्ज मिळवता येणार आहे. ऑनलाईन अर्जाची वेबसाईट व अर्ज प्रक्रिया या लेखांमध्ये शेवटी देण्यात आलेली आहे
PM Vishvakarma Last Date 2023 PM विश्वकर्मा योजना शेवटची तारीख 2023
PM विश्वकर्मा श्रम सन्मान योजना नुकतीच सुरू करण्यात आलेली असल्यामुळे या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किंवा मुदत अद्याप सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही. योजनेसाठी ठरवण्यात आलेली व्याप्ती निधी 13,000 ते 15,000 करोड रु. असून हा निधी वाटप जवळजवळ आल्यानंतर शेवटची मुदत देण्यात येईल, असा अंदाज आहे.
Vishwakarma Yojana Website 2023 विश्वकर्मा योजना वेबसाईट 2023
विश्वकर्मा योजनेची सद्यस्थितीत फक्त अंमलबजावणी किंवा घोषणा करण्यात आलेली असल्यामुळे अद्याप यासाठी कोणत्याही प्रकारची अधिकृत (Official) वेबसाईट सुरू करण्यात आलेली नाही. 17 सप्टेंबर 2023 दिवशी ही योजना सुरू करण्यात आल्यानंतर सलग्न योजनेचा अधिकृत संकेतस्थळसुद्धा शासनाकडून जाहीर करण्यात येईल. त्यामुळे अर्जदारांनी कोणत्याही चुकीच्या अथवा बोगस वेबसाईटवर नोंदणी किंवा चौकशी करू नये. PM विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाईन Registration प्रक्रिया सुरू झालेली आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना, कामगारांना गावातील सामायिक सेवा केंद्रात नोंदणी करावी लागेल, त्यानंतर कामगारांची पात्रतेनुसार तीन स्तरानंतर अंतिम निवड करण्यात येईल. पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यपद्धतीत राज्यसरकार ही मदत करेल; परंतु यासाठीचा संपूर्णता खर्च केंद्र शासनाकडून करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे
PM Vishvakarma Yojana Documents 2023 विश्वकर्मा योजना कागदपत्रे 2023
1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) मोबाईल क्रमांक
4) ई-मेल आयडी
5) पासपोर्ट आकाराचा फोटो
6)जातीचा दाखला
7) बँक पासबुक
PM Vishvakarma Yojana 2023 (Online Application Process) अर्ज कसा करावाPM Vishvakarma Yojana 2023 (Online Application Process) अर्ज कसा करावा
PM विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाईन Registration प्रक्रिया सुरू झालेली आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना, कामगारांना गावातील सामायिक सेवा केंद्रात नोंदणी करावी लागेल, त्यानंतर कामगारांची पात्रतेनुसार तीन स्तरानंतर अंतिम निवड करण्यात येईल. पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यपद्धतीत राज्यसरकार ही मदत करेल; परंतु यासाठीचा संपूर्णता खर्च केंद्र शासनाकडून करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे अर्ज करण्याची पद्धत खालील प्रमाणे
📍अर्जदाराला प्रथम पीएम विश्वकर्मा पोर्टलच्या अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.inpmvishwakarma.gov.in ला भेट द्यावी लागेल.
📍क्लिक केल्यानंतर, वेबसाइटचे होम पेज तुमच्या स्क्रीनवर उघडेल.
📍वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला How to Register चा पर्याय दिसेल, तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल.
📍क्लिक केल्यावर लगेचच तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल, येथे तुम्हाला अर्ज करण्यासाठी काही माहिती विचारण्यात आली आहे.
📍नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर आणि आधार कार्ड सत्यापित करावे लागेल.यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल.
📍तुम्हाला नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल.
📍आता तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
📍सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
📍अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल
PM Vishvakarma Yojana 2023 questions & Ans पीएम विश्वकर्मा योजनेशी संबंधित प्रश्न/उत्तरे 2023
1) पीएम विश्वकर्मा योजनेत नोंदणी करण्यासाठी अधिकृत वेबसाइट कोणती
आहे पीएम विश्वकर्मा योजनेत नोंदणी करण्यासाठी अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in आहे.
2) पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सरकारकडून किती कर्ज दिले जाईल?
योजनेअंतर्गत, सरकार लाभार्थ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 5% व्याज दराने दोन हप्त्यांमध्ये देईल
3) पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते अर्जदार पात्र असतील?
देशातील सर्व कारागीर आणि कारागीर पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
4) पंतप्रधान विश्वकर्मा योजना 2023 कोणी सुरू केली आहे?
पंतप्रधान विश्वकर्मा योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रसरकार व्दारे सुरू केली आहे.
5 )पीएम विश्वकर्मा योजना कधी प्रसिद्ध झाली?
PM विश्वकर्मा योजना 17 सप्टेंबर 2023 रोजी देशाच्या पंतप्रधानांनी आणि विश्वकर्मा जयंती द्वारे जारी केली आहे.