१० वी पास वर या क्षेत्रात मिळवा सरकारी नोकरी वाचा सविस्तर | List of 10th Pass Govt Jobs in India in marathi

List of 10th Pass Govt Jobs in India in marathi नमस्कार मित्रांनो आज आपण 10 वी नंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करू शकतो. याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो आपल्या देशात सरकारी नोकरी ला खुप महत्व दिले जाते. कारण सरकारी नोकरी मध्ये मिळणाऱ्या,पगार ,कामाची सुरक्षा, इत्यादी सुविधा यासाठी आपल्या देशात सर्वांना सरकारी नोकरी मिळावी असं वाटत.पण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आपल्या त्या पद्धतीने शिक्षण घ्यावं लागतं त्या मध्ये चांगल्या टक्केवारी ने उत्तीर्ण व्हावे लागते. त्यांनतर परिक्षा द्यावा लागातात. परिक्षा झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर मिरीट लिस्ट लागणार त्यानंतर आपला नंबर लागतो किंवा लागात नाही. अश्या इत्यादी गोष्टी आहेत. त्यामुळे आपल्या देशात सरकारी नोकरी ला खुप महत्व दिले जाते. तर मित्रांनो आता आपण 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरी मिळवू शकतो. ते कसे तर चला मग List of 10th Pass Govt Jobs in India in marathi याबद्दल सविस्तर माहिती घेऊ जेणेकरून तुम्ही 10 नंतर सरकारी नोकरी मिळवून आपले स्वप्न पूर्ण करू शकता.

Instagram Group Follow करा

Maseb Job Details महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत सरकारी नोकरी

महाराष्ट्र राज्याच्या तसेच इतर राज्यांच्या वीज मंडळात विविध पदाच्या भरती प्रक्रिया राबविण्यात येतात. आणि त्यामध्ये विविधपदे भरली जातात. या मध्ये वायरमन, विद्युत सहायक अशा प्रकारची पदे भरली जातात. या पदासाठी तुम्ही 10 वी नंतर ही अर्ज दाखल करू शकता. 10 वी बरोबर तुम्ही औधोगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित विभागांमध्ये आयटी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तुम्ही या पदासाठी अर्ज करून सरकारी नोकरी मिळवू शकता. या बद्दल अधिक माहितीसाठी पुढील प्रमाणे दिलेल्या वेबसाईट ला भेट द्या – https://www.mahadiscom.in/

Indian Post Recruitment & Carrer Details in Marathi भारतीय डाक विभाग भरती व सरकारी नोकरी बद्दल माहिती

मित्रांनो दुसरी सरकारी नोकरी बद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय ग्रामीण डाक विभाग अर्ज करू शकतात या मध्ये डाक सेवक, टास्किंग स्टाफ अशा विविध पदांसाठी भरती केली जाते. ही पदे 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पात्रतेवर भरली जातात.यामध्ये ग्रामीण डाक सेवक या पदासाठी 10 वी च्या गुणा आधारे भरती करण्यात येते.तुम्ही सुद्धा 10 वी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला पोस्ट खात्यात सरकारी नोकरी करायची असेल तर तुम्ही या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. जेंव्हा भारतीय डाक विभाग तर्फे भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल तेव्हा आपल्या सोशल मीडिया ग्रुप वर आणि आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. अधिक माहितीसाठी

Police Bharti Carrer Details in Marathi पोलिस दलामध्ये सरकारी नोकरी बद्दल माहिती

मित्रांनो पोलिस भरती ही विविध राज्यांमध्ये सतत भरती प्रक्रिया राबविण्यात येते. यामध्ये विविध राज्यांमध्ये 10 वी पासवर सुध्दा भरती केली जाते या भरती मध्ये विविध पदे असतात. तसेच पोलिस डिपार्टमेंट मधील कारागृह विभागात सुद्धा अनेक प्रकारची पदे 10 वी पास वर भरती केले जाते. तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.आणि सरकारी नोकरी मिळवू शकता. पोलिस भरती बद्दल अधिक माहितीसाठी पुढील प्रमाणे दिलेल्या वेबसाईट ला भेट द्या – https://www.mahapolice.gov.in/

Indian Railway Bharti & Carrer Details in Marathi भारतीय रेल्वे मध्ये सरकारी नोकरी बद्दल माहिती

मित्रांनो आपल्याला तर माहिती आहे आपल्या भारतभर आणि भारता बाहेर ही रेल्वे चे जाले आहे. आपल्याला हे पण माहीती आहे भारतात सर्वाधिक सरकारी नोकरी देणारा विभाग म्हणजे भारतीय रेल्वे विभाग भारतीय रेल्वे ही केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येते. यामध्ये 10 वी पास वर टेक्निशीयन, ट्रकमन, गँगमन, पॉइंटसमन,पोर्टर, हेल्पर इत्यादि प्रकारची पदे भरली जातात. त्यांनतर रेल्वे सुरक्षा मध्ये सुद्धा 10 वी पासवर भरती केली जाते. जर तुम्ही 10 वी पास असाल तर तुम्ही सरकारी नोकरी मिळवू शकता. या साठी तुम्हाला रेल्वे विभाग मार्फत भरती प्रक्रियेत अर्ज कराव लागेल. त्यानंतर तुम्ही भारतीय रेल्वे विभाग सरकारी नोकरी आणि सर्व शासकीय सुविधा मिळवू शकता.

Agniveer Bharti & Career Details in Marathi भारतीय सैन्य अग्नीवीर भरती

तर मित्रांनो तुम्हाला तर माहीत असेल भारत सरकारने भारतीय सैन्यामध्ये अग्नीवीर ही नवीन योजना आणली आहे.यामध्ये भारतीय सैन्याच्या वायू,भू-दल तसेच नेव्ही सारख्या दलांमध्ये इच्छुक उमेदवारांची भरती केली जाते. मित्रांनो या भरती मध्ये 10 वी पास उमेदवारांना अर्ज करता येतो.आणि सरकारी नोकरी मिळवू शकता. या भरती संदर्भातील जाहिरात भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.मित्रानो या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतात. अग्नीवीर भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी पुढील प्रमाणे दिलेल्या वेबसाईट ला भेट द्या – https://www.joinindianarmy.nic.in/

Krushi Vibhag Bharati‌& Carrer Details In Marathi कृषि विभाग भरती बद्दल माहिती

मित्रांनो तुम्हाला पण कृषी क्षेत्रात करिअर करायचं आहे. कृषी क्षेत्रात नोकरी मिळवायची आहे. तर ही माहिती तुमच्यासाठी मित्रांनो जर तुम्ही कृषी क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल आणि तुमचं शिक्षण फक्त 10 वी झाले असेल तर चिंता करू नका. हीच माहिती तुमच्या साठी मित्रांनो कृषी क्षेत्रात विविध पदांसाठी भरती केली जाते. तर मित्रांनो तुम्हाला ही भरती साठी अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो कृषी क्षेत्राच्या अधिकृत वेबसाईट वर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज दाखल करू शकता. तसेच आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा आपण तिथे अपडेट देतो. मित्रांनो तुम्हाला जर कृषी क्षेत्राबद्दल अधिक जाणून घ्यावयाचे असल्यास पुढील प्रमाणे दिलेल्या वेबसाईट ला भेट द्या – https://krishi.maharashtra.gov.in/

Forest Department Bharti Carrer Details in Marathi वनविभाग भरती

मित्रांनो वनविभाग मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येते हे तुम्हाला माहिती आहे. मित्रांनो वन विभागामध्ये वनरक्षक सारख्या पदांसाठी भरती करण्यात येते. तर मित्रांनो वन विभागामध्ये जर तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक असाल तर वनरक्षक विभाग मार्फत जेंव्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल तेंव्हा अर्ज करू शकतात. आणि तुमचे स्वप्न पुर्ण करू शकता. वनरक्षक विभागात बद्दल माहिती हवी असेल तर पुढील प्रमाणे दिलेल्या वेबसाईट ला भेट द्या – https://mahaforest.gov.in/

10 वी पास वरील सरकारी नोकरी कोणत्या ?
10th Pass Government Job

• रेल्वे विभागाची नोकरीची संधी
• इंडियन पोस्ट भरती
• तटरक्षक दल भरती
• सीमा सुरक्षा दल भरती
• SSC – स्टाफ सिलेक्शन कमिशन
• कर्मचारी निवड आयोग भरती
• महावितरण विभाग भरती
• केंद्रीय राखीव दल
• विद्युत विभाग भरती
• वन विभाग भरती

आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा आणि वरील माहिती आवश्यक वाटली असेल आपल्या मित्रांना शेअर करा.

🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top