PM Kisan Yojana 17th Installment 2024 शेतकरी मित्रांनो सर्वांना आतुरता होती ती म्हणजे Pm Kisan च्या 17 व्या हप्त्याची तर मित्रांनो या बाबतची सर्व माहिती आपण पाहणार आहोत तुम्हाला तर माहीत आहे नरेंद्र मोदी यांनी प्रंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला आणि Pm Kisan या योजनेच्या 17 व्या हप्त्याला त्यांनी सही करून मंजुरी दिली होती.आणि सर्व शेतकरी बांधवांना या हप्त्याची लगबग लागली होती.आणि शेतकऱ्यांचा खात्यामध्ये Pm Kisan योजेनेचा हप्ता लवकरात लवकर जमा होईल असे सांगितले जात होते परंतु नक्की कोणत्या दिवशी 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल या बाबतची अधिकृत माहिती आलेली आहे या संदर्भातली सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत. केंव्हा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर 17 हप्ता जमा वाचा.
शेतकरी मित्रांनो 16 हप्ता हे फेब्रुवारी 2024 मध्ये निवडणुकीअगोदर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात आले होते आणि त्यानंतर हा 17 वा हप्ता लवकरचं शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा
Pm Kisan योजेनेचा 17 वा हप्ता नक्की कधी होणार ?
शेतकरी मित्रांनो सर्वांना असणारी आतुरता ही लवकरच संपणार आहे. हा Pm Kisan योजनेचा 17 वा हप्ता हा शेतकऱ्यांना खुप फायदेशीर ठरणार आहे. कारण आता सगळीकडे पेरणी ला सुरुवात झाली आहे. यांच कालावधी मध्ये 17 वा हप्ता पडतोय म्हटल्यानंतर पेरणी ला थोडी फार मदत नक्की होणार. यामुळे आपले शेतकरी बांधव 2000 हजार रुपयांची प्रतिक्षेत आहेत.
तर शेतकरी बांधवांनो अधिकृत माहिती नुसार प्रंतप्रधान नरेंद्र मोदी काशी दौऱ्यावर जाणार आहेत आणि तिथे शेतकऱ्यांची सभा घेणार आहेत. सभे दरम्यान पीएम किसान चा 17 वा हप्ता 18 जून 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहेत.
पैसे जमा झाले की नाही तपासा
01) सर्व प्रथम https://pmkisan.gov.in/या लिंकवर क्लिक करा
02) आता तुमच्या समोर फाॅर्मर कॉर्नर म्हणून एक ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा.
03) त्यानंतर बेनिफिशिअरी स्टेटस वर क्लिक करा.
04) त्यानंतर तिथे आधार नंबर, खाते क्रमांक, मोबाईल नंबर टाका.
05) यानंतर पुढीलप्रमाणे दिसणारा कॅप्चा कोड बरोबर प्रविष्ट करा.
06) कॅप्चा वेरिफाय झाल्यानंतर गेट स्टेट्स वर क्लिक करा.
07) वरील सर्व प्रकिया सविस्तर पूर्ण झाल्यानंतर पीएम किसान च्या खात्यावर पैसे जमा झाले किंवा नाही हे दिसेल.
PM किसान योजनेसाठी याप्रमाणे नवीन नोंदणी करू शकता
01) Pm Kisan च्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाईट वर जा.
02) आता फार्मर कॉर्नर वर क्लिक करा.
03) यानंतर तुम्हाला नवीन शेतकरी नोंदणी या बटणावर क्लिक करायचे आहे.
04) नवीन पेज समोर येईल तिथे आधार कार्ड नंबर टाकायचे आहे .
05) आता तुम्हाला खालील प्रमाणे दिलेला कॅप्चा कोड बरोबर प्रविष्ट करून Verify बटणावर क्लिक करायचे आहे.
06) आता तुम्हाला राज्य आणि जिल्हा निवडावा लागेल.
07) आता तुमच्या समोर एक फ्रॉर्म उघडेल तो फाॅर्म पूर्ण पणे अचुक माहिती भरून घ्या.
08) यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, शेतीविषयक माहिती, बॅक खात्याबद्दल माहिती भरावी लागेल.
09) फाॅर्म पूर्ण पणे भरून झाल्यावर एकदा तपासून पहा आणि त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा.
10) हा फाॅर्म संबंधित कार्यालयात पडताळणी करण्यात येते आणि त्यानंतर आपले नाव पीएम किसान योजनेच्या लाभार्थीं यादी मध्ये येते.
अश्याचं प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!
🪀 वाटसअप ग्रूप जाँईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |