महाराष्ट्र तलाठी भरती बाबत एक नवीन अपडेट – जाणून घ्या संपूर्ण माहिती. Talathi Bharti Update

Instagram Group Follow करा

Talathi Bharti Update नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले महाराष्ट्र काॅर्नर वर मराठी वेबसाईटवर आज आपण जाणून घेऊया महाराष्ट्र तलाठी भरती संदर्भात झालेल्या जागांमध्ये वाढी बद्दल अपडेट आला आहे तर अधिक माहिती साठी आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

Maharashtra Talathi Bharti Vacancy Increased 2023

मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील तलाठी गट क संवर्गातील पदे भरण्यासाठी जून 2023 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहीरात मध्ये त्यांनी नमूद केले होते की जागांची संख्या व आरक्षणाचा प्रवर्ग यामध्ये बदल होऊ शकते.

यानुसारच गडचिरोली व पालघर जिल्ह्यात 24 जुलै 2023 ला जागांच्या संख्यामध्ये बदल करण्यात आला व त्यानुसार त्यांनी सुधारित मागणीपत्रक जाहीर केले होते.

त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अनुकंपाची पदे भरण्यात येऊन बिंदूनामावली प्रमाणे सुधारणा करूनफेर आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सुधारित मागणीपत्रक पाठविण्यात आले होते. त्याला मान्यता मिळाल्या नंतर आता राज्यभरात तलाठी संवर्गाच्या पदे भरण्यासाठी आवश्यक संख्येत 149 ने वाढ करण्यात आली आहे.

त्यामुळे आता सुधारित जागांची संख्या ही 149 ने वाढून 4793 इतकी झाली आहे. तसेच विभागाने या संदर्भात जिल्हा निहाय जागांची स्थिती दर्शवली आहे. या संदर्भात अधिकची माहिती परिशिष्ट 01 मध्ये दिली आहे.

जर तुम्हाला हे वाढलेल्या जागांचे प्रसिद्धिपत्रक डाउनलोड करायचे असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या व अधिक माहीती जाणून घ्या.

तलाठी सरळसेवा भरती नवीन प्रसिद्धिपत्रक – येथे क्लिक करा

अश्याचं प्रकारे सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!

🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top