Majhi Ladki Yojana Apply online Mobile 2024 नमस्कार बांधवांनो तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे की आता झालेल्या अधिवेशनात एक महिलांसाठी योजना सुरू करण्यात आली आहे. या बद्दल संपूर्ण माहिती आपण या अगोदर पण दिलेली आहे. तर मित्रांनो माझी लाडकी बहिण योजना संपूर्ण महाराष्ट्र भर सुरू झाली होती आणि आता या योजनेचा अर्ज प्रक्रिया ही सुरू झाली आहे. या योजनेसाठी पात्र असणारे मोबाईल अॅप्लिकेशन द्वारे अर्ज करू शकणार आहेत. आणि या योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे आणि अर्ज कसा करायचा आहे या बद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.
Majhi Ladki Bahin Yojana Egibilty Criteria Details 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पात्रता –
मित्रांनो आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजेनेत मोठा बद्दल झाला आहे. ते म्हणजे अगोदर काढलेल्या पत्रकामध्ये विविध कागदपत्रांची जाचक अटी घातल्या होत्या आणि महीला त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागणार होता. तर मित्रांनो आता नवीन पत्रकामध्ये ज्या कागदपत्रांची जाचक अटी होत्या त्या रद्द करण्यात आल्या आहेत. आणि आता फक्त काही अटी आहेत त्या महिलांना सहज रित्या शक्य आहेत. आणि अर्ज त्या सहज रित्या भरून पूर्ण करू शकता. या पत्रकामुळे महिलांना फायदा ही झाला आणि जास्त महिला अर्जापासुन वंचित राहणार होत्या त्या पण आता सहज अर्ज करू शकतात.
01) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजेनेचा लाभ घेण्यासाठी वय 21 ते 65 वर्ष असणे आवश्यक आहे.
02) वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे.
03) कुटुंबातील व्यक्ती इन्कमटॅक्स भरणारा नसावा.
04) कुटुंबातील व्यक्ती पर्मनंट नोकरी करणारा नसावा.
05) कुटुंबातील व्यक्तींच्या नावार ट्रॅक्टर वगळता कोणतेही चार चाकी वाहन नसावे.
Majhi Ladki Bahin Yojana Online Application Process Details 2024
आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज मोबाईल द्वारे कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. मोबाईल वर अर्ज करण्याची सेवा देण्यात आली आहे. या सेवेचा सर्वांना फायदा पण होणार आहे. आणि वेळ ही वाचणार आहे.आणि अर्ज प्रक्रिया ही लवकर होईल तर नारीशक्ती अॅप्लिकेशन द्वारे अर्ज कश्याप्रकारे करायचा स्टेप बाय स्टेप खालील प्रमाणे पाहणार आहोत.
01) सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर वरून नारीशक्ती दुत अॅप डाऊनलोड करायचे आहे.
02) आता अॅप उघडा आणि ज्या महिलेचा अर्ज करायचा आहे त्या महिलेचा चालू मोबाईल नंबर टाका. आणि लाॅगिंन करा.
03) यानंतर तुमच्या समोर नियम व अटी अश्या प्रकारे नाव येईल. त्यावर क्लिक करा आणि पुढे जाव लागेल.
04) आता ज्या मोबाईल नंबर ने लाॅगिंन केले त्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल.
05) यानंतर व्हेरिफाय ओटीपी या बटनावर क्लिक करा. आणि ओटीपी टाका.
06) आता तुम्हाला मॅसेज आला असेल की तुमचा प्रोफाइल अपडेट करा म्हणून त्यावर क्लिक करा. तिथे तुमची माहिती भरू शकता.
07) प्रोफाइल अपडेट करता तुमचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, पत्ता, ही माहिती भरायची आहे.
08) प्रोफाइल पूर्ण तयार झाल्यानंतर नारीशक्ती दुत पर्याय वर क्लिक करा.
09) आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यावर क्लिक करा.
10) यानंतर महिलेचे नाव पत्ती किंवा वडिलांचे नाव, जन्मतारीख, पत्ता, पिनकोड , आधार नंबर, मोबाईल नंबर, बॅक खाता नंबर आणि तुमची वैयक्तिक माहिती अश्या प्रकारे काळजी पूर्वक भरून घ्या.
11) यानंतर तुमचे आधार कार्ड, उत्पन्न दाखला, जन्म दाखला, रेशनकार्ड, हमीपत्र हे सर्व कागदपत्रे अपलोड करा. यानंतर पासबुक चार फोटो आणि अर्जदार महिलेचा फोटो अपलोड करा.
12) तुम्ही भरलेली माहिती एकदा तपासा आणि अर्ज बरोबर असेल तर खाली सबमिट बटनावर क्लिक करा त्यानंतर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाका आणि व्हेरिफाय करा यानंतर तुमचा अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली .
अश्याचं प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका 🤩
🪀 वाटसअप ग्रूप जाँईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |