B pharmacy & D Pharmacy career in Marathi Details
After 12th B pharmacy & D Pharmacy career in Marath : नमस्कार मित्रांनो विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालायं आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता पुढे कोणत्या क्षेत्रात शिक्षण घेऊ किंवा करिअर कोणत्या क्षेत्रात करू तर मित्रांनो चला सांगतो.विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर फार्मसी करण्याचा पर्याय काही विद्यार्थी निवडतात. पण त्यातही ‘बी फार्मसी’ करावी कि ‘डी फार्मसी’ करावी याबाबत अनेकांना प्रश्न पडतो. तर मित्रांनो फार्मसी मध्ये दोन प्रकारे करिअर करता येते. ते म्हणजे एक बी फार्मसी आणि डी फार्मसी तर मित्रांनो अनेक मित्रांना बी फार्मसी आणि डी फार्मसी यामधील फरक काय हे माहीती नाही तर चला पाहुयात यामध्ये काय आहे फरक आणि सविस्तर माहिती.
तर मित्रांनो फार्मसीला मराठी औषध निर्माणशास्त्र म्हणतात. बारावीनंतर तुम्ही या कोर्सला प्रवेश Admission घेऊ शकता. त्यासाठी बारावीला ‘पीसीएमबी’ म्हणजेच भौतिकशास्त्र, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी हे विषय घेऊन 12 वी उत्तीर्ण होणे गरजेचे असते. या कोर्सला ऍडमिशन घ्यायचे असेल तर बारावीला किमान ५० टक्के आणि त्याहून जास्त गुण मिळवणे आवश्यक आहे.
आणि केवळ या गुणांवर फार्मसीला प्रवेश मिळत नाही तर महाराष्ट्र शासनाची ‘एमएचटी-सीईटी’ (MHT-CET) ही पूर्वपरीक्षा देखील उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.या दोन्ही परीक्षांचे गुण ग्राह्य धरली जातात आणि त्यानंतर उमेदवारांचा विचार केला जातो.
B pharmacy & D Pharmacy Course Details
मित्रांनो फार्मसीचे दोन प्रकार अभ्यासक्रमाला आहेत, ते म्हणजे. एक ‘बी. फार्मसी’ आणि दुसरा म्हणजे‘’डी. फार्मसी’. या दोन्ही कोर्स मधील फरक आणि सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.
01) B Pharmacy बी.फार्मसी
मित्रांनो बी.फार्मसी कोर्स हा 12 वी नंतर करता येते. या कोर्स ला बॅचलर इन फार्मसी या नावाने ओळखले जाते. हा अभ्यासक्रम/कोर्स 04 वर्षांचा आहे.अभ्यासक्रम एकूण ८ सत्रात परिक्षा घेतली जाते.आणि हा कोर्स पूर्ण करून चांगल्या प्रकारे औषध निर्माण कंपनीत नोकरी करून करिअर करू शकता. या शिवाय तुम्ही मेडीकल पण टाकून स्वतः चार व्यवसाय सुरू करू शकता.आणि चांगल्या प्रकारे करिअर आणि पैसे मिळवू शकता.
02) D Pharmacy डी. फार्मसी
मित्रांनो डी.फार्मसी कोर्स हा 12 वी नंतर करता येते. या कोर्स ला डिप्लोमा इन फार्मसी या नावाने ओळखले जाते.हा अभ्यासक्रम / कोर्स एकूण 02 वर्षांचा आहे.आणि या कोर्स चा अभ्यासक्रम 04 सत्रात परिक्षा घेतली जाते.आणि हा कोर्स करुन तुम्ही चांगल्या प्रकारे करिअर करू शकता. हा अभ्यासक्रम/ कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही मेडिकल परवाना मिळवू शकता. आणि औषध निर्मिती कंपनीत नोकरी देखील मिळवू शकता आणि चांगल्या प्रकारे पगार ही मिळतो आणि चांगल्या प्रकारे करिअर ही करू शकता.
After 12th Pharmacy Admission Process in Marathi
मित्रांनो 12 वी नंतर फार्मसी ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया बद्दल जाणून घेऊया – 1
मित्रांनो 12 वी झाल्यानंतर फार्मसी ला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. प्रवेश परीक्षेचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला तुमची रँक कळते. त्यानंतर Pharmacy Admission Councelling CAP Round साठी अर्ज करावा लागतो. कॅप राऊंड चा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कोणती कॉलेज पाहिजे त्याचा ऑप्शन फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर Pharmacy Admission Councelling CAP Round 3 राऊंड होतात. या कॅप राऊंड मध्ये विद्यार्थ्यांना कॉलेज वाटणी केली जाते. कॅप राऊंड मध्ये कॉलेजची निवड झाल्यानंतर त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायला जावे लागते.
After 12th Pharmacy Admission Required Document List in Marathi
12 वी झाल्यानंतर फार्मसी प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –
01) आधार कार्ड
02) 10 वी व 12 वी मार्कशीट
03) शाळा सोडल्याचा दाखला
04)जातीचा दाखला
05)जात वैधता प्रमाणपत्र
06) अधिवास प्रमाणपत्र
07) दिव्यांग प्रमाणपत्र
08) EWS सर्टिफिकेट असल्यास
09) उन्नत प्रमाणपत्र
10) MHT-CET निकाल/ NEET निकाल / JEE Main निकाल.
वरील सर्व कागदपत्रे तयार करून ठेवा आणि लगेच अर्ज करा.
B pharmacy & D Pharmacy Top 10 College Details
भारतातील 10 उत्तम काॅलेज –
01) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.
02)नागपूरभानूबेन नानावटी कॉलेज ऑफ फार्मसी मुंबई.
03) जी एच रायसोनी विद्यापीठ ,
04)अमरावती वाय बी चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी ,औरंगाबाद
05) आरसी पटेल फार्मासिटिकल एज्युकेशन ,शिरपूर
06) शोभाबेन प्रतापभाई पटेल स्कूल ऑफ फार्मसी अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट ,मुंबई
07) पुना कॉलेज ऑफ फार्मसी ,पुणे
08) बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी ,मुंबई
अधिक माहिती साठी आणि नवीन अपडेट साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका. कारण आपण सर्व गोष्टी आपल्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये शेअर करत असतो.