Mukhyamantri Apprenticeship Yojana 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन योजने बद्दल माहिती पाहणार आहोत पण ही योजना दुसरी कुठली नसून ही योजना तरूणांनासाठी आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल तरूणांना आहे पण कोणत्या तरुणांनसाठी आणि कशी तर चला पाहुयात. तर मित्रांनो ही योजना महाराष्ट्र सरकार मार्फत राबविण्यात येणार आहे. तर मित्रांनो या योजनेचे संपूर्ण नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अशे आहे. ही योजना महाराष्ट्रातील बेरोजगार तरूणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन तरूणांना रोजगार मिळवण्यासाठी मदत करते. या योजनेचे एक धोरण आहे की एका वर्षात 10 लाख तरुणांना रोजगार मिळवून देऊन तरूणांना आत्मनिर्भर बनवणे. पात्रता काय आहे ? अर्ज पद्धत आणि इतर सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.
Mukhyamantri Apprenticeship Yojana Details
योजनेचे लाभ याबद्दल सविस्तर माहिती वाचा
• प्रत्येक महिन्याला 6.000 ते 10,000 रूपये पर्यंत विद्यावेतन.
• विविध क्षेत्रातील कुशल आणि अकुशल आणि साॅप्ट स्किल प्रशिक्षण.
• रोजगार मेळावा आणि स्वयंरोजगारासाठी संपूर्ण मार्गदर्शन.
• विनामूल्य प्रशिक्षण आणि इतर सुविधा.
Mukhyamantri Apprenticeship Yojana Esibilty Details
पात्रता काय आहे ?
01) महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
02) किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03) वय किमान 18 ते 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
04) बेरोजगार असणे आवश्यक आहे.
Mukhyamantri Apprenticeship Yojana Document Details
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –
01) आधार कार्ड
02) पासपोर्ट
03) महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
04) 10 वी पास दाखला आणि मार्कलिस्ट असणे आवश्यक आहे.
05) जात प्रमाणपत्र
06) बेरोजगारी प्रमाणपत्र
07) बॅंक खाते पासबुक
Mukhyamantri Apprenticeship Yojana Apply Method Details
अर्ज करण्याची पद्धत –
01) सर्व प्रथम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण यांच्या अधीकृत वेबसाइटला भेट द्या.
02) आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज या बटणावर क्लिक करायचे आहे.
03) सर्व आवश्यक माहिती प्रविष्ट करा. आणि नोंदणी करू घ्या.
04) तुमच्या नोंदणीकृत इमेल आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी टाका आणि तुमचे प्रोफाइल उघडा.
05) आता लाॅगिंन झाल्यानंतर अर्ज करा बटनावर क्लिक करा.
06) अर्ज पूर्ण पणे भरून घ्या.आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
07) आता जमा करा या बटणावर क्लिक करा.
08) अर्ज प्रत डाऊनलोड करा.
Mukhyamantri Apprenticeship Yojana Office Gr Details
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा GR – डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |