
Police Bharti Document List 2025 नमस्कार मित्रांनो पोलिस भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत किंवा करणार आहेत. अश्या उमेदवारांना अर्ज करताना कोण कोणते कागदपत्रे लागतात. याबद्दल ची सविस्तर माहिती आपण खालील लेखात पहाणार आहोत. मित्रांनो पोलिस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवाराकडे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. कारण कागदपत्रे नसल्यास अर्ज पुर्ण दाखल करता येत नाही. यासाठी उमेदवाराकडे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो पोलिस भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
Police Bharti Document List in Marathi 2025
तर मित्रांनो पोलिस भरती ची तयारी करत आहात आणि पोलिस भरती साठी लागणारी कागदपत्रे कोणती लागतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या मित्रांनो पोलिस भरती किंवा अन्य कोणत्याही भरती साठी कागदपत्रे ही लागतात यात कोणतीही शंका नाही.परंतु आता आपण पोलिस भरती साठी लागणारी शैक्षणिक कागदपत्रे कोणती याबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो पोलिस भरती निघण्याच्या अगोदरच आपण हे कागदपत्रे काढलेले पाहीजेत. कारण भरती निघाली की उमेदवारांची धावपळ होते. आणि कागदपत्रे वेळेत निघतील का नाही याची खात्री नसते.
यासाठीच मित्रांनो तुम्हाला Police bharti documents list. maharashtra पोलिस भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यांची पुर्ण यादी दिलेली आहे. मित्रांनो खालील प्रमाणे दिलेल्या यादीतील सर्व कागदपत्रे लागतील असे काही नाही. कारण उमेदवार कोणत्या वर्गातील आहे. यावर अवलंबून असते. तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार सुध्दा कागदपत्रे लागतात यासाठी खालील प्रमाणे दिलेली माहिती खुप महत्वाची आहे नक्की वाचा.
Police Bharti Required Document List in Marathi
मित्रांनो तुम्हाला पोलिस भरती मैदानी चाचणी साठी लागणारी कागदपत्रे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे.कारण तुमच्या कडे कागदपत्रे नसतील तर तुम्हाला मैदानी चाचणी मधून अपात्र ठरविले जाते. यासाठी आपण पोलिस भरती साठी लागणारी कागदपत्रे पुर्ण यादी दिली आहे. मित्रानो तुमच्या पात्रतेनुसार खालील प्रमाणे दिलेली डाॅक्युमेंट तपासा आणि झेरॉक्स तसेच ओरिजनल डॉक्युमेंट सोबत घेऊन मैदानी चाचणी साठी तुम्हाला जावे लागेल.
Maharashtra Police Bharti 2025 Document List in Marathi
पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे –
मित्रांनो खालील प्रमाणे दिलेली कागदपत्रे तुम्हाला लागतीलच असे नाही. कारण उमेदवारांच्या पात्रतेनुसार कागदपत्रे लागतात. यामध्ये कोण भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माजी सैनिक यांना सुध्दा पात्रतेनुसार कागदपत्रे लागतात. यासाठी खालील कोण कोणती कागदपत्रे लागतील याची यादी पूर्ण यादी दिली आहे.
01) 10 वी पास मार्कशीट / 12 वी पास मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट.
02) ITI/डिप्लोमा मार्कशीट ( असल्यास )
03) उमेदवार पदवीधर असल्यास, प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्ष गुणपत्रक.
04) पदवी असल्यास प्रथम वर्ष /द्वितीय वर्ष/ द्वितीय वर्ष गुणपत्रक.
05) शाळा सोडल्याचा दाखला.
06) शाळा शिकत असल्यास बोनाफाईड सर्टिफिकेट.
07) जातीचे प्रमाणपत्र.
08) नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र.
09)अधिवास प्रमाणपत्र
10) वयाचा दाखला.
11) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र (EWS) असल्यास.
12) खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरिता 30 टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र.
13) भूकंपग्रस्त प्रमाणपत्र (असल्यास)
14) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र (असल्यास)
15) वडील पोलीस असल्यास त्याचे प्रमाणपत्र (असल्यास).
16) होमगार्ड प्रमाणपत्र (असल्यास)
17) विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र.
18) माजी सैनिक उमेदवाराचे डिस्चार्ज कार्ड ओळखपत्र (असल्यास)
19) माजी सैनिक उमेदवाराचे आर्मी एज्युकेशन (असल्यास)
20) आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन.
21) चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (निवड झाल्यावर लागेल)
महत्वाची माहिती –
• वरील पैकी कोणते कागदपत्रे लागणार आहेत ते लवकरात लवकर काढून घ्या.
• जर तुमचे काही कागदपत्रे हरवले असतील किंवा किंवा खराब झाले असतील तर नवीन काढून घ्या.
• उमेदवाराचे आधार कार्ड वर जसे नाव आहे तसेच सर्व कागदपत्रावर असणे आवश्यक आहे. नसल्यास अपडेट करून घ्या.
• वरील कागदपत्रे तुमच्या पात्रतेनुसार लागतील.
मित्रांनो सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏♥️
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
मित्रांनो वरील माहिती महत्वाची वाटली तर आपल्या पोलिस भरती तयारी करणाऱ्या मित्रांना शेअर करा ⏩