
Courses after 10th class नमस्कार मित्रांनो 10 वी उत्तीर्ण झाला आहात आणि आता 10वी नंतर करायचं काय ? अश्या प्रकारे प्रश्न पडला असेल तर चिंता करू नका तर तुम्हाला करिअर निवडण्यास आम्ही मदत करणार आहोत. तर मित्रांनो आपण करिअर कोणतं पण निवडतो आणि आपण त्या मध्ये आपली आवड निर्माण होत नाही. तर मित्रांनो करिअर निवडल्यानंतर आपली आवड निर्माण झाली पाहिजे. असे न झाल्यास करिअर चांगल्या प्रकारे होऊ शकत. नाही या बद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया.
Courses after 10th class In marathi
दहावी नंतर करायचं काय ?
तर मित्रांनो 10वी नंतर करायचं काय 10वी नंतर कोणकोणते कोर्सेस आहे ते खालीलप्रमाणे दिले आहे. तर चला जाणून घेऊ.
01) आयटीआय कोर्सेस ये ITI Courses
02) Diploma in engineering courses – डिप्लोमा इन इंजीनियरिंग कोर्सेस
03) PUC ( pre- University Course ) – 11वी आणी 12वी PUC
04) vacation courses – वेकेशन कोर्सेस
05) certificate courses – सर्टिफिकेट कोर्सेस
तर मित्रांनो वरील पैकी कोणताही कोर्स तुम्ही निवडू शकता. म्हणजे तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे. अश्या क्षेत्रात तुम्ही चांगल्या प्रकारे करिअर करू शकता. तसेच मित्रांनो जर तुम्हाला 10 वी नंतर नोकरी करायची असेल तर तुम्हाला अनेक पार्ट टाईम कोर्सेस उपलब्ध आहेत.
परंतु मित्रांनो 10 वी नंतर नोकरी करण्याचे वेगवेगळे कारणे आहेत. जसे की कोणाची अर्थिक परिस्थिती असो अश्या विविध प्रकारच्या अडचणी आहेत. परंतु कोणत्याही प्रकारची अडचण नसेल तर मित्रांनो नक्कीच पुढील शिक्षण घ्या.
कारण मित्रांनो पुढील शिक्षण घेण्याचे फायदे हे तुम्हाला पुढील आयुष्यात मिळतील. मित्रांनो जर तुम्ही 10 नंतर नोकरी करायचे ठरवले आणि नोकरी करु लागले तर तुम्हाला चांगल्या प्रकारे पगार ही मिळणार नाही. आणि ठराविक मर्यादेपर्यंत पगार राहील. यासाठी मित्रांनो पुढील शिक्षण सुरू राहुद्या.
तर मित्रांनो तुम्ही 10 वी 12 वी नंतर चांगल्या प्रकारे पुढील शिक्षण घेतले तर तुम्हाला सरकारी आणि खासगी क्षेत्रात नोकरी मिळवू शकते आणि चांगल्या प्रकारे पगार ही मिळवू शकतो. या साठी मित्रांनो पुढील शिक्षण घेणं खूप महत्वाचं आहे. जर परिस्थिती चांगली असेल तर पुढिल शिक्षण नक्की घ्या आणि चांगल्या प्रकारे करिअर करा.
तर चला तर मग जाणून घेऊया की, दहावीनंतर आपल्याला कोणकोणते डिप्लोमा कोर्सेस करता येतात.
Diploma Courses After 10th In marathi
10वी नंतर डिप्लोमा कोर्सेस ची लिस्ट –
01) आयटीआय कोर्स – ITI Courses
मित्रांनो आयटीआय कोर्स – ITI Courses तुम्ही करू शकता. या कोर्स मध्ये तुम्हाला इंडस्ट्रीयल क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जाते. या मध्ये तुम्हाला इंडस्ट्रीयल कश्या प्रकारे काम करते. याबद्दल ही सांगितले जाते. या कोर्सेस मध्ये विविध क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जाते. या आयटीआय कोर्सेस – ITI Courses मध्ये तुम्हाला प्रॅक्टीकल ज्ञान जास्त दिले जाते. या कोर्स मध्ये तुम्हाला लिखाणा पेक्षा प्रॅक्टीकल ज्ञान महत्वाचे असते. कारण आपण इंडस्ट्रीयल क्षेत्राती कार्य करणार आहोत. आयटी आय कोर्सेस मध्ये ही विविध प्रकारचे कोर्सेस आहेत. ते कोणते ते आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊया. आणि या मध्ये काही कोर्सेस एक आणि दोन वर्षांकरिता आहेत.
• आय टी आय इलेक्ट्रिशियन कोर्स
• आय टी आय वायरमन कोर्स
• आय टी आय मशिनिस्ट कोर्स
• आय टी आय फिटर कोर्स
• आय टी आय वेल्डर कोर्स
• आय टी आय टर्नर कोर्स
• आय टी आय प्लंबर कोर्स
वरील पैकी कोणत्याही कोर्स मध्ये करिअर आणि आवड निर्माण करू शकतात.
Diploma in engineering courses (Polytechnic )
02) डिप्लोमा इन इंजीनियरिंग कोर्सेस (पॉलिटेक्निक)
मित्रांनो दहावीनंतर विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू शकतात. अभियांत्रिकी अभ्यासक्रमात डिप्लोमा देखील करू शकता. विद्यार्थ्यांना दहावी मध्ये गणित व विज्ञान विषयांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
डिप्लोमा इन इंजीनियरिंग कोर्सेस (पॉलिटेक्निक) या कोर्स मध्ये विविध प्रकारचे कोर्सेस आहेत या कोर्सेस बदल जाणून घेऊ.
• डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनियर
• डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर
• डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअर
•डिप्लोमा इन कंप्यूटर इंजिनियर
• डिप्लोमा इन केमिकल इंजिनियर
• डिप्लोमा इन मेडिकल इंजिनियर
• डिप्लोमा इन टेक्स्टाईल इंजिनिअर
मित्रांनो वरील पैकी कोणत्याही कोर्स मध्ये करिअर करू शकता. वरील डिप्लोमा तिन वर्षांच्या अभ्यासक्रम असतो यानंतर तुम्ही इंजिनीअरिंग करु शकता किंवा बीटेक आणि बीई अॅडमिशेन घेऊ शकता. आणि इंजिनीअरिंग साठी तुम्हाला दुत्तीय वर्षाला प्रवेश मिळतो.
Top Certificate Courses In marathi Information
03) सर्टिफिकेट कोर्स –
मित्रांनो वर सांगितल्याप्रमाणे सर्टिफिकेट कोर्स आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता. आणि हे कोर्स तुम्ही दहावीनंतर सुद्धा करू शकता. हे कोर्सेस पूर्ण करून नक्की चांगल्या प्रकारे करिअर करू शकता.
• एथिकल हैकिंग कोर्स
• ॲप डेव्हलपमेंट
• वेब डिजाइनिंग कोर्स
• ट्राफिक डिझाईन
मित्रांनो वरील पैकी कोणताही एक कोर्स करुन तुम्ही चांगल्या प्रकारे करिअर करू शकता.
Diploma in Fashion Technology In marathi
04) फॅशन टेक्नॉलॉजी
मित्रांनो सर्व प्रथम फॅशन डिझाईन आणि फॅशन टेक्नॉलॉजी या मध्ये खूप फरक आहे.मित्रानो फॅशन टेक्नॉलॉजी कोर्स केल्यानंतर तुम्ही गारमेंट कंपनीमध्ये काम करू शकता.
• कोर्स कालावधी– 3 वर्ष
• नोकरी– कॉस्ट्यूम डिजायनर, फॅशन डिझायनर टेक्सटाइल डिजायनर यापैकी कोणत्याही पदावर तुम्ही काम करू शकता.
Diploma in plastic Technology Information marathi
05) प्लास्टिक टेक्नॉलॉजी-
मित्रांनो प्लास्टिक टेक्नॉलॉजी मध्ये करिअर करायचे असेल तर हा कोर्स खुप महत्वाचे आहे. आता आपण पाहतो प्लास्टिक चा वापर किती होतो तर हे कोर्स तुम्ही करू शकता.
• कोर्स कालावधी– 3 वर्ष
• नोकरी – हा कोर्स केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रोजेक्ट इंजिनियर,इंडस्ट्रिअल इंजिनिअर, प्लास्टिक पार्ट मॉडल डिझाईन इंजिनियर, आणि प्रॉडक्ट डिझाईन इंजिनियर यांसारख्या विविध पदांवर काम करु शकता.
Diploma in Stenography information
06) लघुलेखन डिप्लोमा –
• कोर्स कालावधी– 1 वर्ष
• नोकरी– हा कोर्स केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जिल्हा परिषद, आयुक्त कार्यालय, आयकर विभाग आणि विद्यापीठ मंत्रालय यांसारख्या विविध ठिकाणी नोकरी मिळवू शकते.
Diploma in Agriculture In Marathi
07) कृषी तंत्रज्ञान पदविका –
मित्रांनो तुम्हाला जर शेती करण्याची आवड असेल तर हा कोर्स तुमच्या साठी उत्तम आहे. मित्रांनो तुम्हाला तर माहीती आहे आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. तर यामध्ये या कोर्सेस चा मोठा वाटा आहे.
• कोर्स कालावधी – 2 वर्ष
• नोकरी– मित्रांनो हा कोर्स केल्यानंतर तुम्ही बीटेक एग्रीकल्चर इंजिनियर मध्ये करिअर करू शकता.
हेही वाचा – दहावी नंतर हे डिप्लोमा कोर्स करा आणि लगेच उच्च पगाराची मिळवा
Art Teacher Diploma in Marathi
08) आर्ट टीचर डिप्लोमा-
• कोर्स कालावधी- 2 वर्ष
• नोकरी – मित्रांनो हा कोर्स नंतर तुम्ही आर्ट शिक्षक म्हणून नोकरी करू शकता.
Commerical Art Diploma Information in Marathi
09) कमर्शियल आर्ट डिप्लोमा –
• कोर्स कालावधी– 2 ते 3 वर्ष
• नोकरी – मित्रांनो तुम्ही हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला ॲडव्हर्टायझिंग कंपनी, आर्ट स्टुडिओ पब्लिशिंग हाउसेस, फॅशन हाऊसेस या मध्ये नोकरी करू शकता.
Diploma in Animation Course Marathi
10) ॲनिमेशन डिप्लोमा –
मित्रांनो तुम्हाला तर माहीती आहे की आता सर्व डिजिटल झालेले आहे. तर यामध्ये तुम्ही थ्रीडी ॲनिमेशन कोर्स पूर्ण करून नक्की करिअर करू शकता.
•कोर्स कालावधी – 18 महिने ते 2 वर्ष
• नोकरी – मित्रांनो हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही ॲनिमेशन कंपनी मध्ये जॉब करू शकता.
Diploma in Hotel Management and Catering Technology
हॉटेल मॅनेजमेंट –
मित्रांनो तुम्हाला जर हाॅटेल व्यवसायात यशस्वी भरारी घ्यायची असेल तर तुम्ही कोर्स पूर्ण केले पाहिजे
• कोर्स कालावधी– 2 वर्ष
• नोकरी– मित्रांनो हा डिप्लोमा केल्यानंतर केटरिंग ऑफिस, केटरिंग सुपरवायझर & असिस्टंट आणि कॅबिन क्रू या पदावर नोकरी करू शकता.
Diploma in Fire safety engineering
12) फायर सेफ्टी इंजीनियरिंग –
मित्रांनो फायर सेफ्टी इंजीनियरिंग या मध्ये चांगल्या प्रकारे करिअर करू शकता. आणि या कोर्स मध्ये फायर सेफ्टी या बद्दल सविस्तर माहिती दिली जाते.
• कोर्स कालावधी– 2 वर्ष
• नोकरी – हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला फायर सेफ्टी ऑफिसर या पदावर नोकरी मिळवू शकता.
Diploma in Cyber Security
13) सायबर सिक्युरिटी-
मित्रांनो तुम्हाला या कोर्स मध्ये एथिकल हॅकिंग बद्दल ज्ञान दिले जाते.
• कोर्स कालावधी – 1वर्ष
• नोकरी – मित्रांनो हा कोर्स केल्यानंतर तुम्ही सरकारी किंवा प्रायव्हेट एजन्सीमध्ये इथिकल हॅकिंग या पदावर नोकरी करू शकता.
Diploma in Dental Mechanics
14) डेंटल डिप्लोमा –
• कोर्स कालावधी– 2 वर्ष
• नोकरी– मित्रांनो हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला डेंटिस्ट, असिस्टंट डेंटल सर्जन,डेंटल टेक्निशिअन आणि रिसर्च असिस्टंट यांसारख्या पदावर काम करु शकता.
Diploma in Beauty care Information
15) ब्युटी केअर-
• कोर्स कालावधी– 4 वर्ष
• नोकरी – मित्रांनो हा कोर्स केल्यानंतर तुम्ही स्वतःच ब्युटी पार्लर सुद्धा चालू करू शकता. किंवा एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये ब्युटिशन म्हणून सुद्धा नोकरी कर शकता.
मित्रांनो तुमच्या मनातील काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे
01) दहावी नंतर मी १ वर्षाचा डिप्लोमा करू शकतो का?
उत्तर – हा ६ महिने ते १ वर्षाचा कोर्स आहे .
02) मला डिप्लोमा घेऊन नोकरी मिळू शकेल का?
उत्तर – आयटीमध्ये डिप्लोमा कोर्स पूर्ण करणारे विद्यार्थी विविध आयटी फर्म्स आणि संबंधित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवू शकतात.
03) दहावी नंतर कोणती पदवी सर्वोत्तम आहे?
उत्तर – दहावी नंतर उच्च पगारासह सर्वोत्तम अभ्यासक्रमांमध्ये अभियांत्रिकी पदविका, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान (एमएलटी), डिजिटल मार्केटिंग, इंटिरियर डिझाइन, हॉटेल व्यवस्थापन आणि वित्तीय लेखा यांचा समावेश आहे.
04) कोणता डिप्लोमा सर्वात जास्त पगार आहे?
उत्तर – उच्च पगारासाठी सर्वोत्कृष्ट डिप्लोमा कोर्सेसमध्ये डिप्लोमा इन इंजिनीअरिंग, डिप्लोमा इन ॲनिमेशन अँड मल्टीमीडिया, डिप्लोमा इन फॅशन डिझाईन, डिप्लोमा इन नर्सिंग , इत्यादींचा समावेश आहे.
05) डिप्लोमा २ वर्षांचा असतो की ३ वर्षांचा?
उत्तर – डिप्लोमा कोर्स हा तीन वर्षांचा असतो
अश्याचं नवीन करिअर अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |