मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 महाराष्ट्र मराठी : अर्ज ऑनलाइन, पात्रता, अनुदान CM saur krishi pump Yojana 2023

CM Saur Krishi Pump Yojana 2023 | सौर कृषी पंप योजना 2023 महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी |महाराष्ट्र सरकारी योजना Solar Pump Yojana Maharashtra | सौर कृषी पंप योजना ऑनलाइन अर्ज कसा करावा राज्यातील शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरावी, शाश्वत व्हावी तसेच राज्यातील शेतकरी संपन्न आणि सुखी व्हावा असे महाराष्ट्र शासनाचे उद्दिष्ट आहे, यासाठी महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना, धोरणे नियोजनबद्ध पद्धतीने राबवीत असते, याच धोरणाचा अवलंब करून शेततळे योजना, सौर कृषी पंप योजना या सारख्या योजना शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून या योजनांची अंमलबजावणी करत आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप आस्थापित करण्याची योजना जाहीर केली आहे, सौर उर्जा हा उर्जेचा शाश्वत आणि अखंड स्त्रोत आहे, भारतासारख्या देशामध्ये आठ महिने कडक उन असते, त्यामुळे निसर्गाकडून मिळालेल्या या निरंतर उर्जेच्या स्त्रोताचा वापर सौर कृषी पंपच्या माध्यमातून वापरून शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा ठरू शकतो.या लेखामध्ये आपण महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 विषयी संपूर्ण माहिती जसे या योजनेच्या अंतर्गत अनुदान किती मिळणार, त्यासाठी पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्र योजने साठी अर्ज कसा करावा इत्यादी माहिती पाहणार आहोत.

Instagram Group Follow करा

CM Solar Krishi Yojana 2023 महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना 2023

या योजनेची अंमलबजावणी शासनाव्दारे राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केली आहे, तसेच शेतकरी वापरत असलेले पारंपारिक विजेवर चालणारे कृषी पंपांना पुरवठा होत असलेल्या विद्युत पुरवठ्यामध्ये वारंवार बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होणे, तांत्रिक वीज हानी वाढणे, रोहोत्र बिघाड होण्यामध्ये वाढ, विद्युत अपघात, विद्युत चोरी या सारख्या समस्यांमुळे अखंडित व शाश्वत विद्युत पुरवठा होण्यास अडचणी निर्माण होतात, या शिवाय जिथे विद्युत पुरवठा उपलब्ध नाही अशा ठिकाणी शेतकरी डिझेल इंधनाचा वापर करून कृषी पंप चालवितात जे त्यांना डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अत्यंत महागात पडते, पर्यायाने या सर्व समस्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते, याला पर्याय म्हणजे सौर कृषी पंप राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध करून दिल्यास वरील सर्व समस्यांवर मात करता येऊ शकते. यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 मोठ्याप्रमाणात राबविण्याचा शासनाचा विचार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 उद्दिष्ट CM Solar Krishi Yojana 2023

ज्याच्या अनेक भागातील शेतकरी आजही शेती सिंचनासाठी डिझेल पंप किंवा इलेक्ट्रिक पंप वापरतात, यामध्ये दुर्गम भागातील शेतकरी डिझेल पंप उपयोगात आणतात, डिझेल पंप महाग असतात तसेच डिझेलचे भाव सुद्धा वाढत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी बराच खर्च करावा लागतो या सर्व बाबींमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते, शेतकऱ्यांना या नुकसानापासून वाचविण्यासाठी त्यांचा शेती सिंचनाचा प्रश्न मिटवणे त्याचबरोबर पर्यावरणाचे सुद्धा संरक्षण करणे हा उद्देश ठेऊन शासनाने हि योजना सुरु केली आहे.महाराष्ट्र राज्यात हि योजना राबवीत असतांना विशेषतः विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये तसेच अतिदुर्गम भागांमधील शेतकऱ्यांसाठी राबविली जाणार आहे. त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांनी भरावयाचा हिस्सा कमीत कमी ठेऊन उर्वरित रक्कम वित्तीय संस्थेमार्फत कर्ज स्वरुपात देण्यात येईल आणि या कर्जाची परतफेड महावितरण कंपनीव्दारे टप्प्या टप्प्याने करण्यात येईल. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांचा हिस्सा सर्वसाधारण लाभार्थ्यांकारिता सौर कृषी पंपांच्या केंद्रीय आधारभूत किंमतीच्या 10 टक्के आणि अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 5 टक्के हिस्सा राहील

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 बद्दल माहिती

योजनेचे नाव –मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र
व्दारा सुरुवातमहाराष्ट्र शासन
राज्य –महाराष्ट्र
लाभार्थी-महाराष्ट्र राज्याचे शेतकरी उद्देश्य राज्याच्या शेतकऱ्यांना सोलर पंप उपलब्ध करून देणे
अर्ज करण्याची पद्धत –ऑनलाइन
अधिकृत वेबसाईट-https://www mahadiscom.in/solar
विभाग –MSEDCL
महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 लाभधारक पंप योजना 2023

• महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि मोलाची योजना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरु केली आहे,

•या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी कमीत कमी दारात सौर कृषीपंप शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचे लाभ खालीलप्रमाणे आहेत.

• मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे, या योजनेच्या अंतर्गत विद्युत कृषीपंपांच्या जागेवर सौर कृषीपंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

• योजने अंतर्गत शासनाकडून सौर कृषी पंपांवर सबसिडी देण्यात येणार आहे, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकार सौर कृषी पंपाच्या किंमतीच्या 95 टक्के सबसिडी देणार आहे आणि यामध्ये लाभार्थ्यांना 5 टक्के रक्कम भरावयाची आहे.

• या योजनेमुळे सौर कृषी पंपांमुळे पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट साध्य होणार आहेयोजने अंतर्गत पाच एकर पर्यंत शेत जमीन असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना तीन HP पंप देण्यात येईल आणि त्यापेक्षा जास्त शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच HP पंप देण्यात येणार आहे

.• मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या पहिल्या टप्प्यात शासनाकडून 25 हजार सौर कृषिपंपांचे वितरण करण्यात येणार आहे, आणि दुसऱ्या टप्प्यात 50 हजार सौर कृषीपंपांचे वितरण केले जाईल आणि तिसऱ्या टप्प्यात शासनाकडून शेतकऱ्यांना 25 हजार सौर कृषीपंपांचे वितरण करण्यात येणार आहे

• मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंतर्गत राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडे आधीच विद्युत कनेक्शन आहे, त्या शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत सौर उर्जेवर चालणारे AG पंपांची सुविधा दिली जाणार नाही.हि योजना ऑनलाइन असल्यामुळे अर्जदार या योजनेमध्ये अर्ज कधीह आणि कोठूनही करू शकतात, त्यामुळे योजनेत ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यामुळे अर्जदाराचा वेळ वाचेल.

• या योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे जुने डिझेल पंप बदलून त्याजागी नवे सौर कृषी पंप बसविण्यात येणार आहे त्यामुळे वातावरणातील प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संरक्षण होईल, तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेमुळे विद्युत विभागावरचा वीज वितरणाचा अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होईल.

• मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेमुळे शासनाकडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिल्या जाणाऱ्या वीज अनुदानाचा शासनावरचा बोजाही कमी होण्यास मदत होईल.

• या योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी होण्यास मदत होईल त्यामुळे शेतीमध्ये उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल पर्यायी शेतकरी संपन्न होईल

• सौर कृषी पंपांचा हमी कालावधी हा पाच वर्षाचा असणे व सोलर मोड्यूल्सची वॉरंटी 10 वर्षाची असणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक अटींची कंत्राटामध्ये समावेश करण्यात येईल तसेच सौर कृषी पंपांसाठी पुरवठादारांकडून 5 वर्षासाठीचा सर्वांकष देखभाल व दुरुस्ती करार महावितरणकडून नोंदणीकृत करून घेण्यात येईल.

• सौर कृषी पंप आस्थापित झाल्यानंतर तो संबंधित लाभार्थ्यास हस्तांतरित करण्यात येईल. त्यानंतर त्याची दैनंदिन देखभाल व देखरेख करण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहील.

• सौर कृषी पंप आस्थापित झाल्यानंतर त्याची आस्थापना व कार्यन्वित अहवाल अधीक्षक अभियंता, महावितरण यांच्याकडून महावितरण कार्यालयाच्या मुख्यालयास सादर करण्यात येईल.वित्तीय सहाय्याच्या रकमेची मागणी करून सदर निधी प्राप्त करून घेण्याची जबाबदारी महावितरणची असेल.• आस्थापित करण्यात आलेल्या सौर कृषी पंपांची तांत्रिक तपासणी महावितरणामार्फत करण्यात येईल.

• या योजनेची अंमलबजावणी करतांना त्यासाठी आवश्यक असणारे अर्जाचे विहित नमुने, आस्थापना अहवाल, उपयोगिता प्रमाणपत्र व संबंधित बाबी व तांत्रिक तपासणी नमुना इत्यादी महावितरणामार्फत निर्गमित करण्यात येतील

• या योजनेचे आवश्यक लेखे महावितरणामार्फत ठेवण्यात येतील.

• राज्य शासनाच्या व इतर आर्थिक स्त्रोतातून महावितरणामार्फत प्राप्त होणाऱ्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र व भौतिक व आर्थिक अहवाल वेळोवेळी सादर करेल.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना 3 HP आणि 5 HP सोलर पंपासाठी लाभार्थी पात्रता

महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना 2023 मोठ्याप्रमाणात राबविण्यात येणार आहे त्यामुळे या योजनेसाठी शासनाने लाभार्थ्यांसाठी पात्रता निकष ठरवून दिलेले आहे, शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे पात्रता निकष माहित असणे आवश्यक आहे, या योजनेचे पात्रता निकष खालीलप्रमाणे असतील.

• मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे, असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील, परंतु या शेतकऱ्यांकडे पारंपारिक पद्धतीने विद्युत कनेक्शन नसणे आवशयक आहे.

• या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पारंपारिक पद्धतीने विद्युत कनेक्शन नसलेले शेतकरी तसेच विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, महावितरण कंपनीकडे विद्युत कनेक्शनसाठी पैसे भरूनही प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांपैकी, ज्यांना नजीकच्या काळात विद्युत कनेक्शन मिळणे शक्य नाही असे शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजने अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी यांना सदर योजने अंतर्गत प्राधान्य राही

• वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारी शेतजमीन असणारे शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र असतील.• योजनेच्या अंतर्गत सौर कृषी पंपांसाठी सर्वसाधारण गटांच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के आणि अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून 5 टक्के याप्रकारे लाभार्थी हिस्सा म्हणून भरणे आवश्यक असेल

• या योजने अंतर्गत पाच एकरापर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन HP सौर कृषी पंप आणि पाच एकरांपेक्षा जास्त शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच HP सौर कृषी पंप देण्यात येतील.

📍मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना 7.5 HP सोलर पंपांसाठी लाभार्थी पात्रता

• विहीर किंवा कुपनलिका यापैकी जलस्त्रोत असणे आवश्यक आहे.

• अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार अतिशोषित, शोषित, आणि अंशतः शोषित गावांमधील विहिरींमध्ये व कूपनलिकांमध्ये नवीन सौर कृषीपंप अनुज्ञेय असणार नाही.

• अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार ज्या सुरक्षित पाणलोट क्षेत्रांची उपसाची स्थिती 60 टक्के पेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहिरींमध्ये व कूपनलिकांमध्ये नवीन सौर पंप देण्यात येतील.

• खडकाळ क्षेत्रांमध्ये खोदल्या जाणाऱ्या बोरवेल विहिरी हे सिंचनाचे शाश्वत साधन नसल्याने बोरवेल विहिरींमध्ये नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार नाही. परंतु गाळाच्या क्षेत्रांमध्ये खोदल्या जाणाऱ्या कुपनलिका हे शाश्वत सिंचनाचे साधन असल्यामुळे सुरक्षित क्षेत्रांमध्ये कूपनलिकांमध्ये नवीन सौर पंप देण्यात येतील.

• कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रांमध्ये 60 मीटर पेक्षा जास्त खोल असलेल्या विहिरींमध्ये अथवा कूपनलिकेमध्ये नवीन सौर पंप देण्यात येणार नाही.

1) अर्जदाराचे आधार कार्ड

2) शेतीचे कागदपत्र

3) मूळ निवासाचे प्रमाणपत्र

4) बँक पासबुक

5) मोबाईल नंबर

6) ओळख पत्र

7) पासपोर्ट साईज फोटो

8) 7 / 12 उतारा

CM Krishi Solar Pump Yojana 2023 Online apply मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील वेबसाईट वर अर्ज दाखल करावा लागेल अर्ज कसा करावा या बद्दल सविस्तर माहिती खालील लेखात दिलेली आहे वेबसाईट लिंक –https://www.mahadiscom.in/solar/index.html

1) महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम राज्यातील महावितरणच्या आधिकारिक वेबसाईटवर भेट द्यावी लागेल

2) यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज उघडेल या होम पेजवर तुम्हाला Beneficiary Services हा पर्याय दिसेल, यावर क्लिक करावे लागेल

3) त्यानंतर दिलेल्या पर्यायांमधून ‘’Apply Online’’ या पर्यायावर क्लिक करा, यानंतर तुमच्यासमोर ‘’New Consumer’’ हा पर्याय दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल

4) या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवर एक नवीन अर्ज उघडेल.

5) या अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हला भरायची आहे या प्रमाणे

6) Paid Pending AG Connection Consumer Details

7) शेतकऱ्याने जर विद्युत कनेक्शनसाठी पैसे भरून अद्यापही वीज जोडणी झाली नसे तर त्या विषयी माहिती भरावी.

8) Details Of Applicant And Location

9) त्यानंतर अर्जदाराने आधार कार्ड प्रमाणे संपूर्ण माहिती आणि जागेचा तपशील भरावा

10) Nearest MSEDCL Consumer Number

11) तुम्हाला यानंतर ज्या शेतजमिनीवर सौर पंप बसविण्याचा आहे त्या शेतीबद्दल संपूर्ण माहिती भरावी लागेल. तसेच तुम्हाला जवळचा महावितरण ग्राहक क्रमांक द्यावा लागेल

.12) Details Of Applicant Residential Address And Location

13) या नंतर तुम्हाला तुमच्या घराचा संपूर्ण पत्ता आणि ठिकाणाबद्दल माहिती भरावी लागेल.

14) वरीलप्रमाणे संपूर्ण माहिती तुम्हाला भरावयाची आहे.

15) आता यानंतर अर्जामध्ये मागितलेले सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागेल,

16) त्यानंतर संपूर्ण माहिती भरल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण पडताळणी करा.

17) यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करा, या प्रकारे तुमची योजनेमध्ये अर्ज व्यवस्थित पूर्ण होईल.

CM Solar Pump Yojana help line number सौर कृषी पंप योजना हेल्प लाईन क्रमांक

ऑफिशियल वेबसाईट –https://www.mahadiscom.in/solar/index.html
मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना माहिती PDFhttps://drive.google.com/file/d/1F4gt6SNscXXxaDDVWdofPFhYMLjqP3As/view?usp=drivesdk
हेल्पलाईन नंबर –1800 102 3435 / 1800 233 3435

महाराष्ट्र सरकारी योजना 2022 संपूर्ण योजनांची माहिती कशी उपलब्ध होईल ?

महाराष्ट्र शासनच्या या महत्वपूर्ण योजनांची माहिती, शासनाकडून या योजनांची माहिती त्या-त्या योजनाच्या संबंधित वेबसाईटवर उपलब्ध करून दिल्या जाते तसेच वेळोवेळी शासनाकडून या योजनांना अपडेट्स सुद्धा केल्या जाते. यानंतर आमच्या महा काॅर्नर वेबसाईट वर सुद्धा आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र योजनांची माहिती उपलब्ध करून दिल्या जाते.

🪀 सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा –https://chat.whatsapp.com/C12RZ46hoJp7wLsy7Pr9p5
🪀 Telegram चॅनेल जॉईन कराhttps://t.me/+Ez8eJOWX0U5hODhl

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top