पत्रकारिता क्षेत्रात करिअर करायचं आहे ? का मग ‘ही’ माहिती तुमच्यासाठी | How to become journalist after 12th in Marathi

How to become journalist after 12th in Marathi नमस्कार मित्रांनो आता 12 वी उत्तीर्ण झालायं आणि पत्रकारिता क्षेत्रात करिअर करायचं आहे. तर ही माहिती तुमच्यासाठी तर मित्रांनो भरपूर तरूणांना वाटत असतं टिव्हीवर बातम्या पाहुण की आपण ही टिव्हीवर यायला पाहिजे पत्रकार व्हायला पाहिजे.आपली ओळख सर्वत्र व्हायला पाहिजे असे नव्हे तर सामान्य लोकांच्या अडचणी आपल्या पत्रकारितेतून सोडता याव्यात. सामान्य लोकांसमोर सत्य परिस्थिती उघड करून स्वतःची एक बेधडक भूमिका पत्रकार म्हणून पत्रकार या क्षेत्रात असावी. असे अनेक यूवकांना, विद्यार्थ्यांना वाटत असतं. पण पत्रकारिता क्षेत्रात येण्यासाठी कोणते कोर्स आहेत. पत्रकार बनण्यासाठी काय करावे किती वर्ष लागतात पत्रकार होण्यासाठी. कशी आणि काय तयारी करावी लागते पत्रकार होण्यासाठी या संदर्भातील पुरेपूर माहिती नसल्याने अनेक यूवकांनचे स्वप्न अपूर्ण राहतात आणि आणि त्यानंतर काही तरूण चुकीच्या क्षेत्रात पाऊल टाकताना आणि वेळ खर्च होतो त्यासाठी आपल्या विद्यार्थी मित्राचा वेळ खर्च होणार नाही या साठी आपण पत्रकारिता क्षेत्रात करिअर करण्यासाठी How to become journalist after 12th In Marathi कोणत्या गोष्टी कराव्या लागतात. यांच्याबद्दल आपण सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

What is a journalist? / What is the job of a journalist?

पत्रकार म्हणजे काय ? / पत्रकार यांचे काम काय असते ?

मित्रांनो पत्रकार वेगवेगळ्या दैनंदिन घडामोडी , घटना , माहिती यांच्या बातम्या तयार करून वृत्तपत्रांमध्ये ही बातमी लिहिणे व T.V च्या माध्यमातून ही बातमी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे. हे पत्रकार यांचे काम आहे. दररोज अनेक घटना घडत असतात. या घटनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे असते. एखाद्या ठिकाणी झालेला अपघात, एखाद्या ठिकाणी झालेली हानी, राजकीय घडामोडी, नैसर्गिक आपत्ती, योजना, नोकरी इत्यादी या घटना सर्वसामान्य जनतेपर्यंत स्पष्ट व खरी, माहिती पोहोचवणे हे पत्रकार निर्भिडपणे करतात.

01) पत्रकार बनण्यासाठी काय शैक्षणिक पात्रता लागले?

02) कोणते कोर्स करावे लागतात ?

03) पत्रकार झाल्यानंतर पगार किती मिळतो ?

यासह अनेक प्रश्नांची उत्तरे आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

Educational qualification required to become a journalist

शैक्षणिक पात्रता –

मित्रांनो पत्रकार होण्यासाठी सर्व प्रथम तुम्ही किमान कोणत्याही शाखेतून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पत्रकारिता क्षेत्रात तुम्ही कोणत्या विषयांतून उत्तीर्ण असाल तरी तुम्ही या क्षेत्रात करिअर करू शकता. पत्रकारिता क्षेत्रात अनुभावाला जास्त विचारात घेतले जाते. आणि या क्षेत्रात विविध भाषांचे ज्ञान असणे आवश्यक इंग्रजी, हिंदी अश्या अनेक भाषाचे ज्ञान पत्रकारिता क्षेत्रात करिअर करण्यासाठी असणे आवश्यक आहे.

याचबरोबर योग्य व स्पष्ट बोलणे व लिहिणे महत्त्वाचे आहे. आणि या मध्ये चुक होण्यासाठी जागचं नाही कारण तुम्ही लिहील्या बोललेल्या बातम्या लाखो करोड प्रेक्षक वाचतात बघतात. तसेच संगणकाचे ज्ञान पत्रकारिता क्षेत्रात करिअर करण्यासाठी असणे आवश्यक आहे व Indian Institute Of MASS Communication म्हणजेच IIMC ची परीक्षा द्यावी. ही परीक्षा ऑल इंडिया बेस्ट आहे. ही परिक्षा दिल्या तर तुम्ही पत्रकारितेमध्ये करिअर करू शकता.

What course to do after 12th in Marathi

12 वी नंतर कोणते कोर्स आहेत ?

मित्रांनो 12 वी कोणत्याही शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला पत्रकारितेसाठी लागणारी कोर्स करावे लागतील या कोर्स बद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

01) Bachelor of Arts – Journalism

02) Bachelor of Journalism & Mass Communication

मित्रांनो वरील दोन्ही पैकी एक कोर्स तुम्ही करू शकता.हे कोर्स केल्यानंतर न्यूज चैनल, पत्रकार, प्रिंट मीडिया, रिपोर्टर अशा ठिकाणी नोकरी आणि एक निर्भीड पत्रकार म्हणून ओळख मिळवू शकतात.आणि वरील दोन्ही कोर्स 03 वर्ष कालावधीचे आहेत.

What is the course after graduation

ग्रॅज्युएशन नंतर कोणते कोर्स आहेत –

मित्रांनो तुम्हाला जर ग्रॅज्युएशन नंतर नंतर पत्रकारिता क्षेत्रात करिअर करायचे आहे. तर तुम्हाला या दोन कोर्स करावे लागतील. दोन्ही कोर्स बद्दल आपण जाणून घेऊ

01) Diploma

02) PG Diploma

वरील पैकी कोणताही एक कोर्स करू शकता. आणि आपल्या पत्रकारिता क्षेत्रात करिअर करू शकता. आणि वरील दोन्ही कोर्स मध्ये अनेक वेगवेगळे कोर्स येतात याबद्दल सविस्तर माहिती घेऊ

• Master of Art ( Journalism )

• Executive Diploma in Journalism

• Master of Arts ( Mass Communication )

• PG Diploma in Journalism & Mass communication

• PG Diploma in Broadcast Journalism

मित्रांनो पत्रकारिता क्षेत्रात तुम्हाला फिल्ड वर काम करावे लागते. कारण तुम्हाला अनुभव मिळणे आवश्यक आहे. अनुभव जसा जसा मिळेल तश्याचं प्रकारे ज्ञान वाढेल आणि तुमचा पगार ही चांगल्या प्रकारे वाढेल. मित्रांनो तुम्हाला 15 ते 20 हजार रूपया पर्यंत पगार मिळू शकतो.आणि चांगल्या प्रकारे करिअर करू शकता.

तर मित्रांनो पत्रकारिता क्षेत्रात कश्या प्रकारे करिअर करायचे याबद्दल आपण जाणून घेतले ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटतं असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.

आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका 🤩

🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top