Career in Law After 12th Top Courses in Marathi | 12वी नंतर कायदा क्षेत्रातील शैक्षणिक पर्याय आणि पदवी कोणत्या जाणुन घ्या..!

Career in Law After 12th Top Courses in Marathi नमस्कार मित्रांनो 12 वी उत्तीर्ण झालायं आणि कोणत्या क्षेत्रात करिअर करू हे समजत नाहीये तर ही माहिती तुमच्या साठी अंत्यंत महत्वाची आहे. जर तुम्हाला 12 वी नंतर कायदा क्षेत्रात करिअर करायचे आहे. तर ही माहिती सविस्तर वाचा. तर मित्रांनो तुम्हाला जर कायदा क्षेत्रात उतरून वकील बनायचे आहे. तर तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला कायद्याचे शिक्षण पूर्ण करावे लागेल. पण हे शिक्षण कुठे आणि कसे पुर्ण करायचे माहिती नाही तर मित्रांनो आपण याबद्दल सविस्तर माहिती खालील लेखात दिलेली आहे कृपया सविस्तर वाचा.

Instagram Group Follow करा

career in After 12th Law Information in Marathi

तर मित्रांनो तुम्हाला कायदा अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा आहे. तर तुम्हाला लागाणारी शैक्षणिक पात्रता कोणती आहे याबद्दल सर्व प्रथम जाणून घेऊ तर मित्रांनो कायदा अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी तुम्ही 12 वी सायन्स, कॉमर्स, आर्ट्स या विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळते. पण या मध्ये पदवी अभ्यासक्रम कोणते आहेत आणि त्यांचे फायदे काय आहेत याची माहिती घेऊया.

Career in BBA LLB Information in Marathi

01) बीबीए एलएलबी (ऑनर्स) / BBA LLB (Hons)

मित्रांनो बीबीए एलएलबी (ऑनर्स) / BBA LLB (Hons) म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ (ऑनर्स) / Bachelor of business administration and Bachelor of legislative law. हा अभ्यासक्रम एकुण 05 वर्षांचा असतो. आणि या मध्ये 10 सेमिस्टर असतात. या पदवी अभ्यासक्रमामध्ये व्यवस्थापनाची तत्त्वे, व्यवसाय संप्रेषण, कामगार कायदा, कौटुंबिक कायदा, घटनात्मक कायदा, गुन्हा, कंपनी कायदा, दिवाणी प्रक्रिया संहिता या अभ्यासक्रमाचा अभ्यास उमेदवार करतात. व ही पदवी मिळवलेले उमेदवार कायदा कंपन्या आणि इतर संबंधित व्यवसायांद्वारे नियुक्त केले जाऊ शकतात. तसेच वकील बनण्याचा आणि तुमचा स्वतःचा कायदेशीर सराव सुरू करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहेत.

Career in LLB After 12th in Marathi

02) एलएलबी (ऑनर्स)/ LLB (Hons)

मित्रांनो एलएलबी (ऑनर्स) म्हणजे बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ (ऑनर्स) / Bachelor of legislative law. हा अभ्यासक्रम एकुण 03 वर्षांचा असतो. आणि या मध्ये 06 सेमिस्टर असतात. या पदवी अभ्यासक्रमामध्ये विविध कायद्यांचे शिक्षण समाविष्ट असते. ही पदवी मिळवल्यानंतर उमेदवार एखाद्या खाजगी कायदा संस्थांमध्ये वकील म्हणून काम करू शकतो. किंवा भारतीय कायदा व्यवस्थेत अभियोक्ता म्हणूनही काम करू शकतो. तसेच या क्षेत्रात पुढील शिक्षण घ्यायचे असेल तर LLM (Masterof Law) हे पदव्युत्तर शिक्षणही घेऊ शकतो.

हेही नक्की वाचा – Software engineering Course After 12th in Marathi | 12वी नंतर साॅफ्टवेर इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचे आहे ? तर ही माहिती तुमच्या साठी

Career Guidance in BA LLB After 12th in Marathi

03) बीए एलएलबी (ऑनर्स) / BA LLB (Hons)

मित्रांनो बीए एलएलबी (ऑनर्स) म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स आणि बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ (ऑनर्स) / Bachelor of arts and Bachelor of legislative law. हा अभ्यासक्रम एकुण 05 वर्षांचा असतो.आणि या मध्ये 10 सेमिस्टर असतात. बीए एलएलबी (ऑनर्स) च्या अभ्यासक्रमात लॉ ऑफ टॉर्ट्स, लीगल इंग्लिश, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, क्रिमिनोलॉजी सोशियोलॉजी, कॉन्स्टिट्यूशनल लॉ, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, अर्बन सोशिऑलॉजी, फिलॉसॉफी, पब्लिक इंटरनॅशनल लॉ आणि हेल्थकेअर लॉ या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. मित्रांनो बीए एलएलबी (ऑनर्स) हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही उच्च शिक्षण (LLM पदवी) घेऊ शकता.तुम्हाला देशभरातील आघाडीच्या कायदेशीर कंपन्यांकडून वकील म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.

मित्रांनो वरील माहिती आवश्यक वाटल्यास 12वी पास मित्रांना नक्की शेअर करा कारण त्यांना करिअर निवडण्यास मदत होईल धन्यवाद 🙏♥️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top